छावणी परिषद उपाध्यक्षपदी दिनकर आढाव बिनविरोध
By Admin | Updated: March 16, 2017 00:49 IST2017-03-16T00:48:58+5:302017-03-16T00:49:12+5:30
देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपा-रिपाइं युतीचे दिनकर आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

छावणी परिषद उपाध्यक्षपदी दिनकर आढाव बिनविरोध
देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपा-रिपाइं युतीचे दिनकर आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी केलेला जल्लोष व मिरवणूक काढण्यात आली.
बाबूराव मोजाड यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या उपाध्यक्ष निवडीसाठी बोर्डाची विशेष सभा पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडीयर प्रदीप कौल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, मावळते उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, मीना करंजकर, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, लष्कर सदस्य ब्रिगेडीयर एस.एम. सुदुंबरेकर, मेजर पीयूष जैन, कर्नल संजय कपूर आदि उपस्थित होते.