लसीकरणाची नियोजन करण्याची दिनकर पाटील यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:15 IST2021-05-12T04:15:14+5:302021-05-12T04:15:14+5:30
शहरातील हजारो नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. नियमाप्रमाणे ४० ते ४५ दिवस पूर्ण झाल्याने दुसरा डोस वेळेत ...

लसीकरणाची नियोजन करण्याची दिनकर पाटील यांची मागणी
शहरातील हजारो नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. नियमाप्रमाणे ४० ते ४५ दिवस पूर्ण झाल्याने दुसरा डोस वेळेत मिळणे गरजेचे आहे. लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या केंद्रांवर वणवण भटकावे लागत आहे. तरीही त्यांना दुसरा डोस मिळत नाही. अशीच परिस्थिती १८ ते ४४ वयोगटातील लोकांची झाली आहे. लस मिळावी म्हणून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. परंतु बऱ्याच वेळा रजिस्ट्रेशन होत नाही. तरी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची मर्यादा वाढविणे गरजेचे आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यांना जवळपासचे केंद्र उपलब्ध होत नाही. लस घेण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी. महापालिका आयुक्तांनी सर्व नागरिकांना वेळेवर लस मिळण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.