दुचाकी घसरल्याने दिंडोरीची युवती ठार
By Admin | Updated: May 9, 2017 22:24 IST2017-05-09T22:24:48+5:302017-05-09T22:24:48+5:30
त्र्यंबकेश्वररोडवरील एबीबी सर्कल परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने पाठीमागे बसलेल्या १८ वर्षीय युवतीचा मृत्यू
_ns.png)
दुचाकी घसरल्याने दिंडोरीची युवती ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : त्र्यंबकेश्वररोडवरील एबीबी सर्कल परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने पाठीमागे बसलेल्या १८ वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़९) दुपारच्या सुमारास घडली़ प्रियंका अनंत चौधरी (रा़दिंडोरी, ता़ दिंडोरी, जि़नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे़ दरम्यान, या अपघातामध्ये दुचाकीस्वार युवकही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका चौधरी ही मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत असून, गंगापूररोड परिसरातील मुलींच्या वसतिगृहात राहत होती़ प्रतीक कैलास सूर्यवंशी (२० रा.टेलिफोन कॉलनी, दिंडोरी) या युवकाच्या दुचाकीवर बसून ते दुपारी २ वाजेच्या सुमारास नाशिकहून त्र्यंबकला जात होते़