शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

दिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 5:38 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग एके काळी नागली व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे पावसाळी हंगामात पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची न्ाििर्मती झाल्यांमुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या पारपांरिक पिकामध्ये बदल करु न जास्त उत्पादन देणाºया पिकांकडे वळल्यांमुळे नागली व वरई पिक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देलखमापूर : परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

लखमापूर : दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग एके काळी नागली व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे पावसाळी हंगामात पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची न्ाििर्मती झाल्यांमुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या पारपांरिक पिकामध्ये बदल करु न जास्त उत्पादन देणाºया पिकांकडे वळल्यांमुळे नागली व वरई पिक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.साधारणपणे नागली व वरई पिक चार महिन्याचे असते त्यांत या पिकांचे रोपे तयार करावे लागतात. मे महिन्यातच या रोपासाठी काडी कचरा गोळा करून रोपाची जागा भाजून घेतात. व जून महिन्यात पहिला पाऊस पडल्या नंतर रोपे टाकली जातता साधारण २२ते२३ दिवसा मध्ये हे रोपे तयार होतात मग जमिनीची मशागत करून व पावसाचा अदांज पाहून नागली , वरई पिकाची लावणी केली जाते हे पिक जास्ती जास्त डोंगरउतारावर घेतले जाते या पिकाला भरपूर पाऊस लागतो.सध्या नागली व वरईला ग्रामीन भागासह शहरी भागात जास्त मागणी आहे.नागलीचा उपयोग भाकरी तसेच पापड बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच सध्यात मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये नागली पापड , बिस्कीटला जास्त मागणी आहे.वरईचा वापर ग्रामीण व शहरी भागामध्ये उपवासासाठी केला जातो. असे असले तरी मागणीच्या प्रमाणात उत्पादन कमी होत असल्यामुळे व नागली वरई पिकाचे एकरी उत्पादन खूपच कमी मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाने या पिकांकडे पूर्णपणे पाठ फिरविल्यामुळे नागली व वरई हे पिक तालुक्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परवडत नसलेली शेती म्हणून या पिकाकडे पाहिले जाते परिणामी या परिसरातील शेतकºयांनी या पांरपारिक शेतीकडे पाठ फिरवून इतर भाजीपाला पिकाना पंसती दिली आहे.

१) नागली ,वरई, हे पिके पुर्वीच्या काळी दिंडोरी तालुक्यातील सोन्याचे पिक म्हणून ओळखले जायचे. परंतु आता मात्र काळाच्या ओघात या पिकाला उतरती कळा लागल्याने दिंडोरी तालुक्यात नागली व वरई हे दृष्टी आड जाते कि काय असा सवाल निर्माण झाला आहे.२)कृषी विभागाकडून या पिकांसाठी शेतकरी वर्गाला वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या स्वरूपाची मार्गदर्शन देवून ही शेतकरी वर्गाने हे पिक परवडत नसल्याची खंत दाखिवली आहे.नागली व वरई पिकापासून एकरी उत्पादन खूप कमी मिळत असल्यांमुळे उत्पन्नात घट येते . त्यांमुळे आम्ही हे पिक फक्त कुटूंबासाठी लागेल एवढेच घेतो. नागली,वरई जागी आम्ही इतर पिकानां पंसती दिली आहे.- मोहनराव गायकवाड ,शेतकरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी