In Dindori taluka, 1444 patients overcame the corona | दिंडोरी तालुक्यात १४४४ रुग्णांची करोनावर मात

दिंडोरी तालुक्यात १४४४ रुग्णांची करोनावर मात

ठळक मुद्दे१९ रुग्ण घेत आहेत उपचार 

जानोरी : दिंडोरी तालुक्यात करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना जरी दिसत असले तरी अजूनही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात आतापर्यत १५११ लोक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील १४४४ रुग्णांनी करोनावर मात केली असून ४८ लोकांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या तालुक्यातील १९ करोना रुग्ण उपचार घेत आहेत.
नाशिक शहरापासून दिंडोरीचे अंतर खूप कमी असल्यामुळे तालुक्यातील जनतेचा संबध जास्त नाशिक शहराशी येत असतो तसेच शेतकरी आपला भाजीपालाही नाशिकाच घेवून जातात, त्यांमुळे बऱ्याच शेतक-यांना पहिल्यांदा मार्कटमध्येच करोना संसर्गाची लागण झाल्याचे निष्पण झाले होते.

मात्र तालुका आरोग्य विभागाने गावा गावात हि माहिती दिल्यानंतर मार्केटमध्ये जाणा-यां शेतक-यांनी आपली काळजी घेण्यास सुरुवात केल्यानंतर करोना संसर्गाचे प्रमाण ग्रामीण भागात घटताना दिसू लागले. त्याचप्रमाणे खरीप हंगामात शेतकरी खूप काळजी घेवून हा हंगाम पार पडत आहेत. 


तालुक्यातील जनतेने घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. तालुक्यात करोना संसर्ग जरी कमी झाला असला तरी थांबलेला नाही. अजूनही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्याच प्रमाणे शेतकरी वर्गाने व जी वाहने ग्रामीण भागातून भाजीपाल्यांची वाहतूक करतात आशा लोकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. घराबाहेर पडताना मास्क, सेनीटायझर यांचा वापर करून सुरक्षित अंतर ठेवावे.
- सुजित कोशिंरे. तालुका वैद्यकीय अधिकारी, दिंडोरी.

Web Title: In Dindori taluka, 1444 patients overcame the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.