दिंडोरी पंचायत समितीत सभापतिपदासाठी चुरस
By Admin | Updated: September 4, 2014 00:06 IST2014-09-03T22:14:46+5:302014-09-04T00:06:14+5:30
दिंडोरी पंचायत समितीत सभापतिपदासाठी चुरस

दिंडोरी पंचायत समितीत सभापतिपदासाठी चुरस
दिंडोरी : पंचायत समितीचे सभापतिपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील स्त्री राखीव झाले आहे. या प्रवर्गात केवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीची सदस्य सभापती होणार हे निश्चित झाले आहे.
या प्रवर्गातील तीन महिला सदस्यांमध्ये सभापतिपदासाठी रस्सीखेच होणार असून, उपसभापतिपदासाठी चुरशीची लढाई होणार आहे. शिवसेनेचे पाच, राष्ट्रवादीचे पाच तर मनसे व भाजपाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादी व मनसेची आघाडी होऊन समसमान मते पडत नशिबाचा कौल मनसे व राष्ट्रवादीकडे गेला. तर सेना-भाजपा युतीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. राष्ट्रवादीकडे पुष्पा चौधरी,
अलका चौधरी व मीराबाई गांगोडे या प्रबळ दावेदार असून, यापैकी कुणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून
आहे.