दिंडोरी नगरपंचायत; ७ रोजी सोडत
By Admin | Updated: September 22, 2015 23:53 IST2015-09-22T23:53:25+5:302015-09-22T23:53:42+5:30
दिंडोरी नगरपंचायत; ७ रोजी सोडत

दिंडोरी नगरपंचायत; ७ रोजी सोडत
नाशिक : दिंडोरी नगरपंचायतीची प्रभागरचना व आरक्षणनिहाय सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला असून, त्यानुसार ३ आॅक्टोबर रोजी प्रभागरचना, तर ७ आॅक्टोबरला सोडत पद्धतीने वॉर्डांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचे नगरपंचायत वा नगरपालिकेत रूपांतर करण्याचा निर्णय शाासनाने गेल्या वर्षी घेऊन त्याची प्रक्रियाही सुरू केली असून, दिंडोरी वगळता पाचही ग्रामपंचायतींची वॉर्डरचना तसेच लोकसंख्येवर आधारित आरक्षणाची सोडतही काढण्यात आली आहे. दिंडोरीची अधिसूचना वेळेत निघू शकली नव्हती; आता मात्र अन्य नवीन अस्तित्वात येणाऱ्या नगरपालिकांसोबतच दिंडोरीचीही निवडणूक घेण्याच्या हेतूने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांना प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर केला जाईल व ३ आॅक्टोबर रोजी त्यास मान्यता देण्यात येऊन ५ आॅक्टोबर रोजी जनतेला त्याची सूचना देण्यात येऊन ७ रोजी आरक्षण काढण्यात येईल. १६ आॅक्टोबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार असून, २१ रोजी त्याची सुनावणी व २७ आॅक्टोबर रोजी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकार या नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल.