नांदगाव : नांदगाव बाजार समितीच्या उपसभापतिपदी कळमदरी येथील दिलीप पगार यांची बिनविरोध निवड झाली.बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र देशमुख यांनी रोटेशननुसार पदाचा राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात सोमवारी (दि.७) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापतिपदासाठी दिलीप गोविंद पगार यांचे एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी जाहीर केले. नामनिर्देशन पत्रावर संचालक पुंजाराम जाधव यांनी सूचक, तर दत्तात्रय निकम यांनी अनुमोदक म्हणून सही केली.उपसभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवसेना कार्यालयात बैठक होऊन आमदार सुहास कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या उपस्थितीत दिलीप पगार यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकी वेळी बाजार समितीचे सभापती तेज कवडे, मावळते उपसभापती राजेंद्र देशमुख, संचालक विलास आहेर, एकनाथ सदगीर आदी उपस्थित होते.
नांदगाव बाजार समितीच्या उपसभापतिपदी दिलीप पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 23:01 IST
नांदगाव : नांदगाव बाजार समितीच्या उपसभापतिपदी कळमदरी येथील दिलीप पगार यांची बिनविरोध निवड झाली.
नांदगाव बाजार समितीच्या उपसभापतिपदी दिलीप पगार
ठळक मुद्देबाजार समितीचे उपसभापती राजेंद्र देशमुख यांनी रोटेशननुसार पदाचा राजीनामा