जिल्'ातील प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात ऊहापोह
By Admin | Updated: November 21, 2014 00:34 IST2014-11-21T00:33:02+5:302014-11-21T00:34:04+5:30
जिल्'ातील प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात ऊहापोह

जिल्'ातील प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात ऊहापोह
नाशिक : राज्यातील खासदारांच्या मतदारसंघांतील शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्'ातील प्रश्नांची मांडणी करीत लवकरात लवकर त्यावर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार गोडसे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचा विषय उपस्थित करून दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली. त्याचबरोबर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या विमानतळाच्या हस्तांतरणाचा तिढा तत्काळ सोडवून या ठिकाणाहून विमान सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने पावले उचलावीत, शिलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिकल्स लॅबसाठी राज्य सरकारने लवकरात लवकर केंद्र सरकारकडे जागा हस्तांतरित करावी, दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमीत इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील ५२ एकर जागा ताब्यात घेऊन चित्रनगरी उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, पंतप्रधान ग्रामसडक योजनेची प्रलंबित रस्त्यांची कामे मंजूर करावी, नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने येत्या अर्थसंकल्पात राज्य सरकारच्या वाट्याच्या रकमेची तरतूद करण्यात यावी, अपर कडवा धरणाचे काम हाती घेऊन सिन्नर तालुक्यातील पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती दूर करावी, किकवी धरण उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारच्या मागण्या केल्या. त्यावर येत्या दोन महिन्यांत शासनस्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.