दिलासा : धरणात गणेशमूर्ती, निर्माल्य विसर्जित करू नये यासाठी सेवाभावी संघटना सरसावल्या

By Admin | Updated: August 21, 2014 00:13 IST2014-08-20T23:01:40+5:302014-08-21T00:13:33+5:30

सरदवाडी धरण ‘ओव्हरफ्लो’

Dilasa: A charitable organization urged not to immerse Ganesh idol, Nirmalya in dam | दिलासा : धरणात गणेशमूर्ती, निर्माल्य विसर्जित करू नये यासाठी सेवाभावी संघटना सरसावल्या

दिलासा : धरणात गणेशमूर्ती, निर्माल्य विसर्जित करू नये यासाठी सेवाभावी संघटना सरसावल्या

सरदवाडी : सिन्नर शहरासह पश्चिमपट्ट्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहराजवळील सरदवाडी धरण ओसंडून वाहू लागले आहे.
सरदवाडी धरणातून सरदवाडी, लोणारवाडी, जामगाव व पास्ते या गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणीयोजना राबविण्यात आली आहे. या योजनांसह सरदवाडी परिसरातील सुमारे दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली येते. मंगळवारी सायंकाळी शहरासह पश्चिमपट्ट्यातील सरदवाडी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले.
मंगळवारी दुपारपर्यंत सरदवाडी धरणात सुमारे ४० टक्के पाणीसाठा होता. मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सरदवाडीसह जामगाव, पास्ते, माळेगाव या शिवारात जोरदार पाऊस झाला. धरणाच्या पश्चिमपट्ट्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला.
सरदवाडी धरणाची साठवण क्षमता ७७ दक्षलक्ष घनफूट आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवणक्षमता कमी झाली आहे. शहर व उपनगरातील नागरिक दरवर्षी धरणात हजारो गणेशमूर्ती व निर्माल्याचे विसर्जन करतात. यामुळे धरणात जलप्रदूषण होण्यासह त्याची क्षमता कमी होऊ लागली आहे.
मंगळवारी सायंकाळी शहरासह पश्चिमपट्ट्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरी पूर्वभागात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पाणीटंचाईची समस्या कायम आहे. (वार्ताहर)

Web Title: Dilasa: A charitable organization urged not to immerse Ganesh idol, Nirmalya in dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.