शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या विळख्यात सातपूर पोलीस वसाहत जीर्ण इमारत।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:56 IST

सातपूर : सातपूर पोलीस ठाणे आवारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारती अतिशय जुन्या आणि जीर्ण झाल्या असून, त्यामुळे या इमारतींच्या स्लॅबच्या छताचे प्लास्टर निखळून पडत आहे. सांडपाण्याच्या चेंबरची दुरवस्था झाल्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसांडपाणी, चेंबर तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तक्रारीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : सातपूर पोलीस ठाणे आवारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारती अतिशय जुन्या आणि जीर्ण झाल्या असून, त्यामुळे या इमारतींच्या स्लॅबच्या छताचे प्लास्टर निखळून पडत आहे. सांडपाण्याच्या चेंबरची दुरवस्था झाल्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.साधारणपणे १९७८ साली सातपूर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्याच काळात पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाºयांसाठी निवासाची सोय म्हणून पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस पाच बहुमजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरच्या काळात इमारतींची देखभाल करण्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने सध्या इमारतींच्या चहूबाजूंनी गवत आणि झाडेझुडपे अस्ताव्यस्त वाढलेली आहेत. परिणामी या ठिकाणी डासांच्या उच्छादामुळे पोलीस कुटुंबीय प्रचंड हैराण होत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कायम निर्माण होत असल्याची तक्रार केली जात आहे. या इमारतींत अनेक ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी त्यांचे लहान मुले राहतात, मात्र त्यांना विरंगुळ्याचे कोणतेही साधन या वसाहतीत नसल्याची तक्रार वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण अथवा उद्यान नाही. पोलीस ठाणे आणि निवासी वसाहत यांच्यात खूप जागा असली तरी या जागेचा उपयोग कुटुंबीयांना अजिबात होत नाही. ही मोकळी जागा पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी,चारचाकी वाहनांनी व्यापलेली आहे. वर्षानुवर्षे पडून असलेली ही वाहने गंजलेल्या अवस्थेत आहेत. मोकळ्या जागेत एका बाजूला पोलीस कर्मचाºयांसाठी ग्रीन जिमचे व्यायामाचे साहित्य बसविण्यात आलेले असले तरी वाढलेले गवत आणि दगडांमुळे त्याचा उपयोग फारसा होत नसल्याचे महिलांनी सांगितले.पोलीस ठाण्याची इमारत खूपच जुनी झाल्याने या इमारतीच्या नूतनीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीचे ज्यावेळी बांधकाम सुरू होईल त्यावेळी या निवासी इमारतीदेखील नव्याने बांधण्यात येतील असे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे. या इमारतीतील खोल्या लहान असल्याने कुटुंबीयांना अडचण होत आहे. आता बांधकाम कधी सुरू होईल, याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :PoliceपोलिसHomeघर