मालेगाव महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे डिग्निटी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:31 PM2020-01-10T12:31:05+5:302020-01-10T12:32:01+5:30

मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र मांक १२ ड मधील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे मोहम्मद मुस्तकीम डिग्निटी ७,१७७ इतक्या मताधिक्याने विजयी झाले.

 Dignity of Janata Dal won in the by-election of Malegaon Municipal Corporation | मालेगाव महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे डिग्निटी विजयी

मालेगाव महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे डिग्निटी विजयी

googlenewsNext

मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र मांक १२ ड मधील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे मोहम्मद मुस्तकीम डिग्निटी ७,१७७ इतक्या मताधिक्याने विजयी झाले.त्यांना ७ हजार ९९२ मते मिळाले तर कॉग्रेसच्या मो.फारु ख मो.हनिफ कुरेशी यांना केवळ ५१० मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार अन्सारी मो इम्रान शकील अन्सारी यांना ८१५ मते मिळाले आहेत .जनता दलाने गड राखल्यानंतर मुस्तकीम यांच्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. आज सकाळी दहा वाजता मनपा च्या जुन्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. डिग्निटी यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेत शेवटच्या फेरीपर्यंत आगेकुच कायम राखली.यात त्यांना सात हजार ९९२ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अन्सारी मोहंमद इमरान यांना ८१५ मते मिळाल्याने त्यांचा सात हजार १७७ मताधिक्याने दणदणीत विजय झाला. पोटनिवडणुकीत कॉग्रेसचा धुव्वा उडाला असुन कॉंग्रेसच्या उमेदवाराला अवघे ५१० मतांवर समाधान मानावे लागले. यावेळी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.

Web Title:  Dignity of Janata Dal won in the by-election of Malegaon Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक