मुसळगाव येथे डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन
By Admin | Updated: February 1, 2017 22:38 IST2017-02-01T22:38:32+5:302017-02-01T22:38:48+5:30
मुसळगाव येथे डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन

मुसळगाव येथे डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन
सिन्नर : मुसळगाव येथील डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन तेजल शरद शिंदे या चिमुकलीच्या हस्ते करण्यात आले.
सिन्नर प्रकल्प- २ च्या सीडीपीओ लता गवळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सिन्नर प्रकल्प- १च्या सीडीपीओ मीनाक्षी पाठक, ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ पाटील, मुख्याध्यापक भास्कर ठाकरे, वैशाली सायाळे, उत्तरा कुमावत, इंदिरा बोराळे, मुक्ता सोनवणे, मनीषा सिरसाठ, मंदा सिरसाठ, सुरेखा जोंधळे, शैला थोरात आदि उपस्थित होत्या. मुसळगाव ग्रामपंचायतीने अंगणवाडीस संगणक भेट
दिले.
अंगणवाडीसेविका सुनीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती सोनवणे यांनी आभार मानले. (वार्ताहर)