‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’
By Admin | Updated: December 25, 2015 00:30 IST2015-12-25T00:19:36+5:302015-12-25T00:30:37+5:30
शोभायात्रा : दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’
नाशिकरोड :
‘‘दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा’’
परिसरातील मंदिरांमध्ये व विविध संस्था, श्री दत्तजयंती उत्सव समितीच्या वतीने श्री दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. श्री दत्तजयंतीनिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
श्री दत्त महाराज यांंच्या जयंतीनिमित्त दत्तमंदिररोड येथील श्री दत्तमंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, देवळालीगाव आठवडे बाजार श्री दत्त मंदिर, विहितगाव श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम्, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मुक्तिधाम, लक्ष्मीनारायण मंदिर, बिर्ला मंदिर, ठिकठिकाणचे श्री स्वामी समर्थ केंद्र, जुने अग्निशामक केंद्र, मुक्तिधाम परिसर तसेच नाशिकरोड, जेलरोड, सिन्नरफाटा, जयभवानी रोड आदि ठिकाणी औदुंबर वृक्षाजवळ असलेल्या छोट्या श्री दत्त मंदिरात गुरुवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन, जन्मोत्सव व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ठिकठिकाणी ध्वनिक्षेपकावर श्री दत्त महाराजांवरील गीत, जप गाणे लावण्यात आल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)