ग्रामसेवक गैरहजर असल्याने अडचण

By Admin | Updated: August 8, 2014 01:13 IST2014-08-08T00:36:20+5:302014-08-08T01:13:11+5:30

ग्रामसेवक गैरहजर असल्याने अडचण

The difficulty of being a Gramsevak is absent | ग्रामसेवक गैरहजर असल्याने अडचण

ग्रामसेवक गैरहजर असल्याने अडचण

 

पाथरे : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या कोळगावमाळ ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गेल्या चार महिन्यांपासून आला नसल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसेवक नसल्याने गावाचा विकास खुंटला असून, विद्यार्थी व नागरिकांची विविध दाखल्यांसाठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
गेल्या चार महिन्यांपासून ग्रामसेवक येत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात विविध दाखले व उताऱ्यासाठी हेलपाटे मारत आहेत. सदर ग्रामसेवक कामावर येत नसल्याची लेखी तक्रार पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकाऱ्यांकडे करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे सरपंच निवृत्ती कुमावत, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोळगावमाळ ग्रामपंचायतीत एस. एस. सोनवणे नामक ग्रामसेवक कार्यरत असून, तो ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाची रजिस्टर व कागदपत्रे घेऊन गेल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना आवश्यक असणारी दाखले मिळत नाही.

Web Title: The difficulty of being a Gramsevak is absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.