वस्तूंच्या किमती ठरविताना अडचणी
By Admin | Updated: August 25, 2016 00:47 IST2016-08-25T00:47:23+5:302016-08-25T00:47:32+5:30
मालमत्ता मूल्यांकन : भुजबळ यांच्या फार्ममध्ये परदेशी, पुरातन वस्तू

वस्तूंच्या किमती ठरविताना अडचणी
नाशिक : मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आज तिसऱ्या दिवशीही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्मवरील मालमत्तेच्या मूल्यांकनाची कारवाई सुरू होती़ बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भुजबळांच्या मालमत्तेचे सोमवारपासून मूल्यांकनाचे काम सुरू आहे़
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, त्यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, मुलगा पंकज भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे़
सिडकोत सुमारे दहा एकर परिसरात असलेल्या भुजबळ फार्ममधील बंगल्यांचे
बांधकाम, मौल्यवान वस्तू यांच्या मूल्यांकनाचे कामकाज
अधिकाऱ्यांचे पथक तीन दिवसांपासून करीत आहे. या कामासाठी सुमारे आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याची शक्यता वर्तविली जाते आहे़
भुजबळ फार्ममध्ये काही परदेशी व पुरातन वस्तूही असल्याने त्यांची किंमत ठरविताना अधिकाऱ्यांना अडचणी येत असल्याचे वृत्त आहे़
दरम्यान, सद्यस्थितीत छगन भुजबळ व समीर भुजबळ हे दोघेही सक्तवसुली संचालनालयाच्या न्यायालयीन कोठडीत आहेत़, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गुन्ह्णात या दोघांनाही जामीन मंजूर आहे़ सद्यस्थितीतील कारवाई ही ईडीमार्फत सुरू आहे़ (प्रतिनिधी)