शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये गोधन सांभाळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 15:40 IST

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे. चा-याचे भाव दुप्पट म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये टन इतके झाल्याने नाशिकमधील गोशाळा अडचणीत आल्या आहेत.

ठळक मुद्देगोशाळा चालकांची धावपळदानशुरांनी फिरवली पाठचाऱ्याचे भाव वाढले

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे. चा-याचे भाव दुप्पट म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये टन इतके झाल्याने नाशिकमधील गोशाळाअडचणीत आल्या आहेत.

विशेष म्हणजे अनेक गावांत चारा शिल्लक आहे. परंतु गावांनी शहरी भाागातून किंवा अन्य ठिकाणहून येणा- या नागरिकांना गावबंदी केल्याने चारा असूनही तो आणता येत नाही अडचण झाली आहे.गेल्या २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी सुरू आहे.त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता बाकी सर्व बाजारपेठा बंद झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच बंदचा परिणाम मुक्या प्राण्यांवरदेखील होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील गो शाळांनादेखील त्याचा फटका बसला आहे. नाशिकमधील अनेक गोशाळांपर्यंत चाराच पोहोचत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. दळणवळणाची साधने बंद असून अनेक ठिकाणीगावांमध्ये प्रवेश करण्यास मनाई असल्यानेदेखील चारा आणता येत नसल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका गोशाळेच्या बाबतीत असा प्रकार घडल्यानंतर महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनीमध्यस्थी केल्यानंतर गावकऱ्यांनी चारा नेण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु अन्य अनेक गोशाळामंध्ये अडचणी येत आहेत. संचारबंदीमुळे मजूर उपलब्ध नाही. काही ठिकाणी चारा आणि मजूर उपलब्ध आहेत. परंतु मजूर गावक-यांच्याविरोधात जाऊन चारा भरण्यास तयार नाही.

सिडकोतील मंगल गोवत्स सेवा ट्रस्ट संचलित गो शाळेत सध्या २४ गायी आणि वासरे आहेत. चार महागल्याने या गो शाळांमध्ये एक वेळ चारा आणि एक वेळ भाजीपाला दिला जात असल्याचे या गोशाळेचे संचालक पुरुषोत्तम आव्हाड यांनी सांगितले. सध्या चा-याचे दर अडीच हजारांवरून साडेपाच हजार रुपये प्रति टन असे झाले आहेत. त्यातच संचारबंदीमुळे शहराकडे चारा येत नाही, अशी अवस्था आहे. सध्या तर गोशाळांना सहकार्य करणा-या दानशुरांनी पाठ फिरवल्यानेदेखील खर्च निघणे कठीण झाले आहे. तपोवनातील कृषी गो सेवा ट्रस्टच्या गो शाळेत २०० गायी आहेत. परंतु येथे सध्या चारा पाण्यासह अनेक अडचणी आहेत. सध्या महावीर इंटरनॅशनलसारख्या संस्थाच्या मदतीने गो शाळा कशी तरी सुरू आहे. परंतु लॉकडाउन आणि संचारबंदी वाढल्यास अडचण होणार आहे, असे या ट्रस्टच्या रूपाली जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याcowगाय