नाशकात आता डिझेलही ‘होम डिलिव्हरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST2021-01-19T04:17:54+5:302021-01-19T04:17:54+5:30

याप्रसंगी निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, सिनियर सेल्स ऑफिसर नवलकिशोर, रिटेल इंजिनिअरिंग मॅनेजर पराग ...

Diesel now home delivery in Nashik | नाशकात आता डिझेलही ‘होम डिलिव्हरी’

नाशकात आता डिझेलही ‘होम डिलिव्हरी’

याप्रसंगी निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, सिनियर सेल्स ऑफिसर नवलकिशोर, रिटेल इंजिनिअरिंग मॅनेजर पराग दाणी, उन्मेष कुलकर्णी, राजेंद्र पानसरे, गोविंद झा, माजी स्थायी समिती सभापती अमोल जाधव, शोभना बूब, साक्षी बूब उपस्थित होते.

यावेळी जांभूळकर यांनी डिझेल होम डिलिव्हरीमुळे उद्योजकांची वेळ व पैशांची आर्थिक बचत हॊणार आहे. नाशिक जिल्ह्यात अशी सेवा देणारा के. आर. बूब हा पहिला पेट्रोलपंप पहिला ठरला आहे, असे सांगितले, तर उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे के. आर. बूब पेट्रोलपंप संचालक ललित बूब व प्रदीप बूब यांनी सांगितले. यावेळी धनंजय बेळे, अमोल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

फोटो ओळीं : १८ पेट्रोल

अंबड येथील के. आर. बूब पेट्रोल पंपावर डिझेलची होम डिलिव्हरी सेवेचा शुभारंभ करताना प्रलय जांभूळकर. समवेत ललित बूब, धनंजय बेळे, वरुण तलवार, पराग वाणी, अमोल जाधव ,उमेश कुलकर्णी, शोभना बूब, साक्षी बूब आदी.

Web Title: Diesel now home delivery in Nashik