शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ऐकलं का... निवडणुकीनंतर मला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 13:06 IST

"शिर्डीची जागा देण्यात आली नाही, पण राज्यसभेवर घेतले जाणारच"

नाशिक : लोकसभा निवडणुकीत मी महायुतीकडे दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, शिर्डी मतदारसंघातून  सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही जागा मला देण्यात आली नाही. मात्र, मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे आणि निवडणुकीनंतर कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी दिले आहे, असा दावा  रिपाइं आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केला.

एनडीएला चारशे जागा मिळतीलमहायुतीच्या प्रचारासाठी आठवले नाशिक दौऱ्यावर आले होते, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइंला दोन जागा मिळाव्यात, अशी मी मागणी केली होती. कारण दोन जागांमुळे मला मिळणारी मते राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास उपयुक्त ठरली असती. मात्र, दोन्ही जागा नाकारल्या. परंतु, राज्यसभेत मला संधी मिळेलच.

एनडीएला अत्यंत अनुकूल वातावरण असून, चारशे जागा मिळतील. महाराष्ट्रात काहीही झाले तरी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू येथे प्रथमच भाजपला अधिक जागा मिळतील, असा दावाही आठवले यांनी केला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच मोदींना मोठे केलेभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेले कथित वादग्रस्त विधान त्यांनी केलेच नसावे, असे रामदास आठवले म्हणाले. संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळच दिले आहे, त्यामुळे नड्डा असे बाेलले असतील असे वाटत नाही, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४