शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाने शहर बसेस कमी करून साधले काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:59 IST

शहरातील प्रवासी वाहतूक करण्याची जबाबदारी महामंडळाची नसल्याचे सांगून हात झटकणाऱ्या एस.टी. महामंडळाने गेल्या वर्षभरात शहर परिसरातील जवळपास ७० बसेस काढून टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आणि अनेक मार्गांवरील बसेसच्या फेºयाही कमी केल्या आहेत.

एसटी प्रवाशांच्या गैरसोयीसाठी?नाशिक : शहरातील प्रवासी वाहतूक करण्याची जबाबदारी महामंडळाची नसल्याचे सांगून हात झटकणाऱ्या एस.टी. महामंडळाने गेल्या वर्षभरात शहर परिसरातील जवळपास ७० बसेस काढून टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आणि अनेक मार्गांवरील बसेसच्या फेºयाही कमी केल्या आहेत. महामंडळाच्या या कठोर भूमिकेमुळे विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत असताना महामंडळ मात्र प्रवाशांच्या या अवस्थेला महापालिकेस जबाबदार धरत आहे. प्रवाशांना वाºयावर सोडून बसेस काढून घेणाºया महामंडळाने यातून नेमके साध्य केले तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना सतावत आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एस.टी. महामंडळाने‘प्रवाशांच्या गैरसोयीसाठी’ अशीच भूमिका घेतल्याचा संशय निर्माण व्हावा असे निर्णण घेतले आहे़ महापालिका हद्दीतील बससेवा चालविण्यास नकार देत महापालिकेनेच सदर सेवा चालवावी, अशी अडवणूक केली आहे़ गेल्या वर्षभरापासून नाशिक महापालिकेचा यासाठी महामंडळाने पिच्छा पुरविला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून बससेवा सुरू करण्याबाबत विलंब होत असल्याने शहर बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे अधिकृत पत्र महापालिकेला देत गेल्या वर्षभरात सुमारे ७० बसेस कमी करण्याचा एकतर्फी निर्णयदेखील महामंडळाने अमलात आणला आहे. अशाप्रकारचा निर्णय अमलात आणल्यापासून शहरालगतच्या ग्रामीण भागातून शहरात नोकरी आणि शिक्षणासाठी येणाºया कामगार आणि विद्यार्थीवर्गाला रोजच मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.महापालिकेकडूनदेखील बससेवा चालविण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कोणताही अनुभव पालिकेला नसल्यामुळे साहजिकच अनेक कसोट्यांवर महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र इकडे महामंडळाला थांबण्यास वेळच नसल्याने त्यांनी महापालिकेवरच ठपका ठेवत आपल्या ताफ्यातील बसेस कमी करून टाकल्या आहेत. शहरातील बसेस कमी करून प्रवाशांचे होणारे हाल लपून राहिलेले नसताना प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद शहरी आणि ग्रामीण असा भेद कसा करू शकते हा प्रश्न महामंडळाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.नियम कसेही वळविणारे महामंडळसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मनपा हद्दीतील प्रवासी वाहतुकीची जबाबदारी ही महापालिकांची असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येते. मात्र महापालिका जर एस.टी. महामंडळाला प्रवासी वाहतुकीचा तोटा भरून देणार असेल तर मग मात्र शहरातील बससेवा सुरळीत चालविण्याबाबत महामंडळाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा नियम अडसर ठरत नाही. एस.टी. महामंडळाची ही भूमिका म्हणजे महापालिकांना वेठीस धरण्याची असल्यासारखीच असून, राज्यातील चार महापालिकांची सेवा एस.टी.ने अशाच प्रकारे पुन्हा सुरू केलेली आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक