शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बालमृत्यू कमी करण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:12 IST

राष्टय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या दि.२८ पासून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली.

नाशिक : राष्टय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या दि.२८ पासून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली.बालमृत्यूला अतिसार हे एक प्रमुख कारण मानले जाते. सरासरी १० टक्के बालके ही अतिसारामुळे दगावतात. हे बालमृत्यू प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. सन २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवड्याच्या आयोजनानंतर आता नाशिक जिल्ह्णात २८ मे ते ९ जून या कालावधीत पंधरवडा साजरा केला जाणार आहे. अतिसराचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणणे हा प्रमुख उद्देश असल्याचेदेखील वाघचौरे यांनी सांगितले. या मोहिमेत अतिसार आजाराची माहिती, त्याची कारणे, लक्षणे, उपचार, जबाबदारी, घ्यावयाची काळजी, ओआरएस आणि झिंक गोळीचे महत्त्व, वापर याची माहिती सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे.  सदर उपक्रम हा आरोग्य उपकेंद्रे, अंगणवाडी, प्रशाळा, ग्रामपंचायत या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत आयोजित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपालिका, महानगरपालिका, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी या ठिकाणी ओआरएम आणि झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीचे उपचार करणे सोपे होरार आहे. याबरोबरच आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दुर्गम व अतिसंवेदनशील भागात घरोघरी जाऊन ओआरएम आणि झिंक गोळ्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. यावेळी अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचारदेखील केले जाणार आहे. सदर उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन मुख्य कार्येकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.  हा कार्यक्रम यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. तालुकास्तरावर वैद्यकीय अधीक्षक अध्यक्ष आहेत. अति संवेदनशील व दुर्गम आदिवासी पाडे, मच्छीमारवस्ती, पूरग्रस्त वस्ती, भटक्या जमाती, विटभट्टी, बांधकाम, अनाथ आश्रम या ठिकाणी या तीन महिन्यांत रिक्त असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद