जनता विद्यालयात हिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST2021-07-05T04:10:20+5:302021-07-05T04:10:20+5:30

येवला : येथील जनता विद्यालय माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी प्राचार्य ...

Diamonds in Janata Vidyalaya | जनता विद्यालयात हिरे

जनता विद्यालयात हिरे

येवला : येथील जनता विद्यालय माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

प्रारंभी प्राचार्य दादासाहेब मामुडे, उपमुख्याध्यापिका विद्या शिंदे, पर्यवेक्षक मच्छिंद्र सोनवणे यांच्या हस्ते हिरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी शिंदे, मामुडे यांनी हिरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. विद्यालय परिसरात या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.

सूत्रसंचालन मधुकर आहेर यांनी केले. आभार प्रदर्शन राजेंद्र मार्तंड यांनी केले. कार्यक्रमास संतोष मिसाळ, जवाहर देवरे, रामा गांगुर्डे, योगेश माळी, योगेश भरते, विजय वाघ, शिरीष देशमुख, राजेंद्र पाटील, अजिनाथ पाथरे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - ०४ येवला जनता स्कूल

येवला येथील जनता विद्यालयात हिरे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी प्राचार्य दादासाहेब मामुडे, उपमुख्याध्यापिका विद्या शिंदे, पर्यवेक्षक मच्छिंद्र सोनवणे आदी.

040721\04nsk_4_04072021_13.jpg

येवला येथील जनता विद्यालयात हिरे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी प्राचार्य दादासाहेब मामुडे, उपमुख्याध्यापिका विद्या शिंदे, पर्यवेक्षक मच्छिंद्र सोनवणे आदी.

Web Title: Diamonds in Janata Vidyalaya