‘आदिती’ने साधला संवाद
By Admin | Updated: November 14, 2015 22:14 IST2015-11-14T22:13:39+5:302015-11-14T22:14:21+5:30
‘आदिती’ने साधला संवाद

‘आदिती’ने साधला संवाद
इंदिरानगर : ऐसी लागी लगन, माउली माउली या आणि अशा सुश्राव्य गाण्यांनी गायक संगीतकार रोहन वरुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक हिंदी-मराठी गाण्यांसह अभंग आणि विविध भावगीतांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते इंदिरानगर येथील युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित ‘मंगल प्रभात’ या पाडवा पहाट कार्यक्रमाचे.
राजीवनगर येथील युनिक ग्रुप यांच्यातर्फे युनिक मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत आकाशी झेप घे रे पाखरा, खेळ मांडियेला वाळवंटी ठायी, उगवली शुक्राची चांदणी, मला वेड लागले प्रेमाचे, चिंब भिजलेले, धुंदीत राहू मस्तीत गाऊ, खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, टीक टीक वाजते डोक्यात, नवराई माझी लाडाची लाडाची गं अशा अनेकविध गाण्यांचे सादरीकरण मंगल प्रभात या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली.
या कार्यक्रमात झी मराठी वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ मालिकेतील आदिती अर्थात सुरूची अडारकर या अभिनेत्रीची विशेष उपस्थिती लाभली होती. नगरसेवक सतीश सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात परिसरातील श्रोते उपस्थित होते. (प्रतिनिधी)