शिरेवाडी येथे सर्वरोगनिदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:15 IST2021-09-27T04:15:16+5:302021-09-27T04:15:16+5:30

संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक यांच्यामार्फत संत निरंकारी भवन येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन नाशिक जिल्ह्याचे मुख्य महात्मा ...

Diagnosis camp at Shirewadi | शिरेवाडी येथे सर्वरोगनिदान शिबिर

शिरेवाडी येथे सर्वरोगनिदान शिबिर

संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक यांच्यामार्फत संत निरंकारी भवन येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन नाशिक जिल्ह्याचे मुख्य महात्मा गुलाब पंजवानी व पूनम मिरचंदानी यांच्या हस्ते झाले. यावेळी घोटी शाखेचे मुखी महात्मा सुधाकर दुरगुडे, शिवाजी बारगजे उपस्थित होते. शिबिरासाठी डॉ. संतोष जाधव, डॉ. अजय भन्साळी, डॉ. ॠषीकेश महाजन व भुपेंद्र पाटील, सुदाम राठोड यांनी परिसरातील सुमारे दोनशेपेक्षा जास्त रुग्णांची विविध प्रकारच्या आजारांच्या प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन निरंकारी भवन शिरेवाडीचे मुखिया भावराव धादवड, पांडुरंग बोराडे, गणपत धादवड, कैलास कोरडे, राजेंद्र गायकवाड,आनंदा रोंगटे, ज्ञानेश्वर घोडे, आशा बोराडे, हिरा घाणे, सरिता वायळ, हिरा धादवड व सर्व महिला व पुरुष सेवादल व यांनी केले होते.

Web Title: Diagnosis camp at Shirewadi