शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून नवरात्रोत्सवाची धूम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 01:13 IST

अश्विन मासाची प्रतिपदा अर्थात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, आज देवीची मंदिरे,  सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी घटस्थापना केली जाणार आहे.  यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे या सार्वजनिक  उत्सवाचे उधाण काहीसे कमी असले तरी  परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक कुळाचार पाळले जाणार आहेत.  घटस्थापनेचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर ठेवलेल्या घटाच्यावर पसरलेल्या ताह्मनात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना केली जाते.

नाशिक  : अश्विन मासाची प्रतिपदा अर्थात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, आज देवीची मंदिरे,  सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी घटस्थापना केली जाणार आहे.  यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे या सार्वजनिक  उत्सवाचे उधाण काहीसे कमी असले तरी  परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक कुळाचार पाळले जाणार आहेत.  घटस्थापनेचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर ठेवलेल्या घटाच्यावर पसरलेल्या ताह्मनात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. घटाभोवती पसरलेल्या निवडक मातीच्या वाफ्यात  सप्तधान्ये पेरली जातात. या दिवशी घटाजवळ एकदा पेटवलेला नंदादीप पुढे नऊ दिवस-रात्र तेवत राहणार असतो. नवरात्रात प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे दुर्गासप्तशतीच्या एका एका पाठाचे पठन केले जाते. देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात.  कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला सवाष्ण जेऊ घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणाचा स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. तर कुणी धान्यफराळ करतात.  काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक महिषासुरासह अनेक दैत्यांचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:’ आणि ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ अशी तिची प्रार्थना केली जाते. बाजारपेठेत महिलांची गर्दीn कोरोनाचा कहर काहीसा कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव होत असल्याने घरोघरी महिलांमध्ये उत्साह संचारला आहे.  त्यामुळे शुक्रवारी शहराच्या मुख्य बाजारपेठेत घट खरेदी तसेच लामण दिव्यासाठी वाती खरेदी आणि आणि अन्य कौटुंबिक खरेदीसाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनाचे सावट असले तरी परंपरेनुसार घरातला नवरात्रोत्सव पार पडावा याकरिता महिलांची बाजारात झुंबड उडाल्याचे शुक्रवारी दिसून आले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमNavratriनवरात्री