हाताणेत ‘धोंडी धोंडी पाणी दे’ चा गजर

By Admin | Updated: July 17, 2014 00:29 IST2014-07-16T23:11:32+5:302014-07-17T00:29:42+5:30

हाताणेत ‘धोंडी धोंडी पाणी दे’ चा गजर

'Dhondi Dhandi Water Give' alarm in hand | हाताणेत ‘धोंडी धोंडी पाणी दे’ चा गजर

हाताणेत ‘धोंडी धोंडी पाणी दे’ चा गजर

मालेगाव : तालुक्यातील हाताणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पावसासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे’ चा गजर करत गावातून फेरी काढली. डोक्यावर नारळासह पाण्याने भरलेल्या कळशा घेऊन विद्यार्थी - विद्यार्थिनी त्यात सहभागी झाले.
लेजीमच्या तालात नाचत-गात गावभर ही फेरी काढण्यात आली. यावेळी, मुख्याध्यापक आर. एस. अहिरे, शिक्षक व्ही. बी. भामरे, श्रीमती के. एल. हिरे आदिंसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Dhondi Dhandi Water Give' alarm in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.