ढेकणे महाराज स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम

By Admin | Updated: October 9, 2014 01:11 IST2014-10-09T00:56:17+5:302014-10-09T01:11:18+5:30

ढेकणे महाराज स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम

Dheke Maharaj Memorial Program | ढेकणे महाराज स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम

ढेकणे महाराज स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम


नाशिक : लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्टच्या वतीने नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. १२ ते १४ आॅक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दि. १२ ते १४ दरम्यान गंगापूररोड येथील प्रसाद मंगल कार्यालयात सिद्धयोग साधकांचे शिबिर होणार आहे. सोमवार, दि. १३ रोजी लोकनाथ पथ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा होणार असून, सायंकाळी ५ वाजता प. सा. नाट्यगृह येथे समर्थभक्त भूषणस्वामी आणि वेदमूर्ती गणेश्वरशास्त्री द्राविड यांचे व्याख्यान होणार आहे. मंगळवार, दि. १४ रोजी देहू येथील पांडुरंगबुवा घुले यांचे कीर्तन होणार आहे. गंगापूररोड येथील स्वामी महाराज ट्रस्ट कार्यालयात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Dheke Maharaj Memorial Program