शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन

By संजय पाठक | Published: September 09, 2022 10:47 AM

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू झाले होते

नाशिक-

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू झाले होते. आता या मूर्तीवरील सुमारे 2 हजार किलो शेंदूर कवच काढण्यात आले असून त्यामुळे देवीचे मूळ स्वरूप दिसू लागले आहे पारंपारिक देवी मूर्ती पेक्षा हे स्वरूप वेगळे असून अत्यंत मोहक मूर्ती दिसत असल्याने भाविकांच्या डोळ्यांचे पाणी फिटले.

वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. ही देवी उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी  देवी मानली जाते.काल पासून या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला. त्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप एक दिवसासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या साठी खुले करण्यात आले होते 45 दिवसात देवी मंदिराच्या भोवती महिरापाचे सुशोभीकरण करताना मूर्तीवरील शेंदूर काढण्याचं काम करण्यात आलं. पुरातत्त्व खात्याच्या नियमाचे आणि निकषांचे पालन करून कोणत्याही रसायनांचा वापर न करता हे काम पूर्ण करण्यात आलं. देवीच्या नव्या स्वरूपात हातातील आयुद्धांत मध्ये प्रचंड बदल झालेला दिसतो यापूर्वी 1768 मध्ये देवी वरचा खोळ म्हणजे शेंदूर पडल्याची ऐतिहासिक नोंद पेशवे दप्तरी आहे त्यानंतर आता प्रथमच शेंदूर काढण्यात आल्याने देवीचे वेगळे आणि मोहक स्वरूप दिसू लागले आहे.

देवी मूर्ती संवर्धन हे अतिशय काळजीपूर्वक पुरातत्त्व संकेतानुसार व निर्धारित कालावधीत नाशिकच्या अजिंक्यतारा कन्सल्टंट्सने पूर्ण केले आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संवर्धन वास्तु विशारद स्मिता कासार पाटील  यांच्या नेतृत्वाखाली मुख्य संवर्धक डॉ मॅनेजर सिंग तसेचसंचालक योगेश कासार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य मूर्तिकार किशोर सोनवणे तसेच सतीश सन्नानसे,  समाधान आमले,  प्रकाश ठाकरे, गौरव ठाकरे, धनंजय पळसेकर,  सिद्धांत वाजे यांनी हे काम पूर्ण केले आहे.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरNashikनाशिक