परिचारिकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:13 IST2020-01-29T22:42:39+5:302020-01-30T00:13:22+5:30

देवळा बस अपघातात मृत झालेल्या परिचारिकेबद्दल सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना आक्षेपार्ह पोस्ट करणाºया सामान्य रुग्णालयातील प्रशासन अधिकारी व्ही. डी. पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी येथील परिसेविका व परिचारिकांनी १५ मिनिटे कामकाज बंद ठेवून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले.

Dharna movement of hostages | परिचारिकांचे धरणे आंदोलन

मालेगाव येथील मृत परिचारिकेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या प्रशासन अधिकारी व्ही.डी. पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन करताना अलका पवार, मंगला घुसळे, सुनीता जाधव, जयश्री बैरागी, जयश्री विटाईकर, रंजना साळवे आदी.

ठळक मुद्देमेशी फाटा दुर्घटना : आक्षेपार्ह पोस्टचा निषेध; कारवाईची मागणी

मालेगाव : देवळा बस अपघातात मृत झालेल्या परिचारिकेबद्दल सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना आक्षेपार्ह पोस्ट करणाºया सामान्य रुग्णालयातील प्रशासन अधिकारी व्ही. डी. पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी येथील परिसेविका व परिचारिकांनी १५ मिनिटे कामकाज बंद ठेवून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटील यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मालेगाव - देवळा रस्त्यावर बसच्या अपघातात मालेगाव सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वैद्यकीय सेवे संदर्भातील कर्मचाºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाटील यांनी आक्षेपार्ह पोस्ट केले. या पोस्टचे तीव्र पडसाद उमटले. बुधवारी सकाळी येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचाºयांनी कामकाज बंद ठेवून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. नाशिकच्या वरिष्ठ अधिकाºयांनी कारवाईचे
आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर रुग्णसेवा पूर्ववत सुरू झाली होती.
या आंदोलनात परिसेविका अलका पवार, मंगला घुसळे, सुनीता जाधव, नुरजहाँ शेख, जयश्री बैरागी, जयश्री विटाईकर, रंजना साळवे, तुषार सूर्यवंशी, विजय अल्लाड, अरुण शेळके आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Dharna movement of hostages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप