हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे धर्मयात्रा

By Admin | Updated: September 5, 2015 23:09 IST2015-09-05T23:07:49+5:302015-09-05T23:09:37+5:30

हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे धर्मयात्रा

Dharmayatra by Hindu Dharma Cultures Association | हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे धर्मयात्रा

हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे धर्मयात्रा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे शनिवारी दुपारी विराट संस्कृतीदर्शन धर्मयात्रा व सर्वसामान्य भाविकांची गोदास्नान दिंडी आयोजित करण्यात आली होती. सिडको परिसरातील पवननगर येथून सुरू झालेली धर्मयात्रा पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल, सीबीएस, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे रामकुंडावर आली. या शोभायात्रेचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष महंत हरिहरानंद यांनी केले. विशेष म्हणजे या धर्मयात्रेत सर्व साधू-महंत हे भाविकांसोबत पायीच सहभागी झाले होते. यात महंत सतीशदास भोंगे, भागवत महाराज, प्रमोद महाराज आदिंसह भाविक सहभागी झाले होते. या दिंडीत भजनी मंडळ, दांड पथक, लेझीम पथक तसेच छत्र, चामरे आणि भजने गात मिरवणूक रामकुंडावर आली. तेथे आरती व पूजन करण्यात येऊन स्नान करण्यात आले.

Web Title: Dharmayatra by Hindu Dharma Cultures Association