‘निमा न्यू नाशिक’च्या वतीने धन्वंतरी पूजन
By Admin | Updated: October 24, 2014 01:02 IST2014-10-24T00:55:19+5:302014-10-24T01:02:49+5:30
‘निमा न्यू नाशिक’च्या वतीने धन्वंतरी पूजन

‘निमा न्यू नाशिक’च्या वतीने धन्वंतरी पूजन
नाशिक : नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन, न्यू नाशिक शाखेच्या वतीने धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरी पूजन व निमा-झंडू धन्वंतरी सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी झंडू फार्माचे अधिकारी एस. एस. शेट्टी, मनजित कानसी, अभय कुलकर्णी, डॉ. सचिन देवरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. अभिनंदन कोठारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ डॉ. विश्वास देशपांडे यांचा निमा-झंडू धन्वंतरी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉ. अजय गुजर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष डॉ. उल्हास कुटे, खजिनदार डॉ. अजय पाटील आदि उपस्थित होते.