धांद्रीच्या विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:19 AM2018-06-20T02:19:24+5:302018-06-20T02:19:24+5:30

सटाणा : तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या सासरच्या जाचास कंटाळून धांद्री येथील विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल असून, पती, सासूसह दिरास अटक केली आहे.

 Dhanritya's Marriage Suicide | धांद्रीच्या विवाहितेची आत्महत्या

धांद्रीच्या विवाहितेची आत्महत्या

Next
ठळक मुद्देहुंडाबळीचा गुन्हा पती, सासूसह तिघांना अटक

सटाणा : तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या सासरच्या जाचास कंटाळून धांद्री येथील विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल असून, पती, सासूसह दिरास अटक केली आहे.
देवळा तालुक्यातील तीसगाव येथील केदा पंडित गायकवाड यांची बहीण सरला हिचा विवाह निंबाबाई रामचंद्र मोरे यांचा मुलगा शरद यांच्याशी झाला. विवाह झाल्या पासूनच त्यांच्यात खटके उडत होते. हुंडा आणला नाही आणि आवडत नसल्यामुळे सरलाचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. याला कंटाळून सरलाने सोमवारी रात्री दिलीप चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विवाहितेचा मृतदेह अडकल्यामुळे पोलिसांनी लोहणेर येथील पट्टीच्या पोहणाऱ्या जवानांना पाचारण केले. तब्बल आठ तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडला. विवाहितेचा भाऊ केदा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शरद रामचंद्र मोरे (पती), निंबाबाई मोरे (सासू), आबाजी मोरे, मीना भगवान धिवरे , मंगला बलराज जगताप, आशा अंबादास पानपाटील, संगीता रामचंद्र मोरे यांच्याविरु द्ध हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
सरलाचा खून झाल्याचा आरोप करत तिच्या माहेरच्यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. वैद्यकीय अहवालात पाण्यात बुडूनच सरलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले़

Web Title:  Dhanritya's Marriage Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.