धनगर समाजाचा पिंपळगावी मोर्चा

By Admin | Updated: August 9, 2014 00:50 IST2014-08-08T23:34:51+5:302014-08-09T00:50:19+5:30

धनगर समाजाचा पिंपळगावी मोर्चा

Dhangar community's Pimpalgaon Front | धनगर समाजाचा पिंपळगावी मोर्चा

धनगर समाजाचा पिंपळगावी मोर्चा

पिंपळगाव बसवंत : धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करू नये यासाठी आदिवासी महादेव कोळी समाज विकास संघटनेच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथे मोर्चा
काढून तहसीलदार संदीप आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक
देशमुख यांना लेखी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रभाकर फसाळे, शांताराम गांगुर्डे, दीपक मोरे, राजेंद्र घाडगे, संतोष गांगुर्डे, अर्जुन
वाघेले आदि उपस्थित होते. निफाड फाटा येथून जुना आग्रारोड, साळी गल्ली, ग्रामपालिका कार्यालय, म्हसोबा चौक आणि मेनरोड या मार्गाने येऊन निफाड फाटा येथे सभा होऊन मोर्चा विसर्जित करण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व शांताराम मोरे, अर्जुन वाघले, दीपक मोरे यांनी केले. याप्रसंगी गुलाबराव गांगुर्डे, पंढरीनाथ पिठे, नाना मोरे, अरुण पारधे, गोरख घुटे, श्रावण मोरे, परसराम गांगुर्डे, बाळू चारोस्कर आदि उपस्थित होते.

Web Title: Dhangar community's Pimpalgaon Front