धनश्रीचे धाडस छान, मोराचे वाचविले प्राण

By Admin | Updated: June 24, 2014 00:28 IST2014-06-22T22:57:23+5:302014-06-24T00:28:00+5:30

सिन्नर : sमोरावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना हुसकावले आणि मोराचे प्राण वाचवले.

Dhanashree's courage is good, save Prana | धनश्रीचे धाडस छान, मोराचे वाचविले प्राण

धनश्रीचे धाडस छान, मोराचे वाचविले प्राण

सुनील थोरात ल्ल सिन्नर
सूर्याच्या सोनेरी किरणांनी पूर्व दिशा उजळू लागलेली असतानाच रम्य सकाळी राष्ट्रीय पक्षी मोराचा टाहो ऐकू येण्याऐवजी संकटातील मयूरराजाचे केकालणे आणि कुत्र्यांचे भुंकणे यामुळे एकच गलका झाला. हा गलका ऐकून घराबाहेर उभ्या असलेल्या धनश्रीचे लक्ष मोरावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांकडे गेले. ते पाहून तिने धाव घेऊन मोरावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना हुसकावले आणि मोराचे प्राण वाचवले.
सिन्नर तालुक्यातील मनेगाव शिवारातील शिंदे वस्तीजवळ रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. वस्तीजवळच नेहमी येणारे मोर पाहून आनंदित होणाऱ्या धनश्री साहेबराव शिंदे या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीने एका मोरावर कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला होत असल्याचे ओळखून त्यांना पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केला खरा; तथापि, कुत्र्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. कुत्रे माघार घेत नसल्याचे पाहून धनश्रीने आरडाओरड केल्याने घरात असलेली तिची आई मीरा व वडील साहेबराव शिंदे, काकू कविता नितीन शिंदे, शीतल शिंदे यांनी घरातून बाहेर येऊन पाहिल्यावर मोराला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या धनश्रीला मदत करण्यासाठी तत्काळ धाव घेतली. त्यामुळे कुत्र्यांनी पळ काढला. तोपर्यंत कुत्र्यांनी मोराच्या पायाला, दोन्ही पंखांना जखमा केल्या होत्या. जखमी मोराला उचलून त्यांनी घराजवळ आणले. त्याच्या जखमांवर हळदीचे लेपण करून तांदूळ आणि पाणी पाजल्यावर मोराला थोडी तरतरी आली. या हल्ल्याची माहिती त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मनेगावच्या शिंदेवस्तीवर धाव घेऊन जखमी मोराला ताब्यात घेतले. सिन्नर येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Dhanashree's courage is good, save Prana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.