राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत नाशिकची धनश्री राठी अजिंक्य
By Admin | Updated: May 18, 2017 14:16 IST2017-05-18T14:16:28+5:302017-05-18T14:16:28+5:30
आठ गुण मिळवत पटकावले अव्वल स्थान

राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत नाशिकची धनश्री राठी अजिंक्य
नाशिक : सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य महिला निवड बुध्दीबळ स्पर्धा नाशिकची बुध्दीपळपटू धनश्री राठी हिने आपल्या नावावर केली आहे. स्पर्धेतील या विजयामुळे धनश्रीची महाराष्ट्राच्या महिला बुध्दीबळ संघात निवड झाली असून आगामी जुलै महिन्यात बंगळूरू येथे होणा-या राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत धनश्री महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
या स्पर्धेत नऊ सामन्यात धनश्रीने आठ गुण मिळवले तसेच यात सात सामन्यांमध्ये विजय तर दोन सामने धनश्रीने बरोबरीत सोडवले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभागी खेळाडू धनश्री राठी ही आरवायके महाविद्यालयात विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी असून स्पर्धेतील या कामगिरीच्या जोरावर तिने आपल्या आंतरराष्ट्रीय मानांकनात भरीव सुधारणा केली आहे. या स्पर्धेत धनश्री राठी आठ गुण मिळवत प्रथम तर गायत्री राजपुत आणि व्हिनसेंट अलानिया यांनी ६.६ गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.