धडक युनियनच्या कराराची धडकी, आस्थापनांची पोलिसांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST2021-07-27T04:16:14+5:302021-07-27T04:16:14+5:30
सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील असंख्य कारखाने आहेत. त्यातील कामगारांनी विविध पक्ष - संघटनाचे प्रतिनिधित्व स्वीकारत कंपनीत युनियन स्थापन केली ...

धडक युनियनच्या कराराची धडकी, आस्थापनांची पोलिसांकडे धाव
सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील असंख्य कारखाने आहेत. त्यातील कामगारांनी विविध पक्ष - संघटनाचे प्रतिनिधित्व स्वीकारत कंपनीत युनियन स्थापन केली आहे. वेतनवाढ, बोनस, कामगारांच्या तक्रारी, विविध प्रश्नासंदर्भात त्या त्या कंपनीतील युनियन प्रतिनिधी व व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यात बैठक होणे क्रमपात्र आहे. मात्र ज्या युनियनचा कंपनी आणि तेथील कामगारांचा कुठलाही संबंध नसताना बैठक आयोजित करणे हे बेकायदेशीर आहे. असे असताना मुंबईतील धडक कामगार युनियनने सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील लहानमोठ्या कंपनी व्यवस्थापनाशी बैठकीसंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली.तर किशोर मोरे यांनी धडक कामगार युनियनच्या प्रमुखांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत नाशिक शहरात कलम १४४ लागू असून त्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्याची ताकीद दिली आहे.