पाटणे येथे जंतनाशक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:12+5:302021-09-24T04:16:12+5:30

जंतनाशक मोहिमेमुळे बालकांमधील रक्तशय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण आणणे तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे यांचा समावेश ...

Deworming program at Patne | पाटणे येथे जंतनाशक कार्यक्रम

पाटणे येथे जंतनाशक कार्यक्रम

जंतनाशक मोहिमेमुळे बालकांमधील रक्तशय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण आणणे तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे यांचा समावेश होतो. लहान मुलांचा शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे कृमीदोष लहान मुलांना सहज होणारा आजार आहे. कृमीदोषामुळे कुपोषण व रक्तक्षय तसेच बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते म्हणूनच जंतनाशक गोळ्या घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. वैशाली मंडलिक यांनी केले.

शाळेत जाणाऱ्या व न जाणाऱ्या १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, तसेच अंगणवाडी येथील सर्व बालकांना व शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलींना घरोघरी अशा वर्कर्स मार्फत मोफत जंतनाशक गोळी वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

Web Title: Deworming program at Patne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.