देवपूर क्रिकेट संघाने पटकावला आमदार चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:30 IST2019-03-14T17:25:12+5:302019-03-14T17:30:16+5:30

सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत देवपूर येथील क्रिकेट क्लब संघाने बाजी मारत आमदार चषक पटकावला.

 Devpur Cricket Association has won the MLA Cup | देवपूर क्रिकेट संघाने पटकावला आमदार चषक

देवपूर क्रिकेट संघाने पटकावला आमदार चषक

नॅशनल क्रिकेट क्लब संघाने आयोजित केलेल्या आमदार चषक करंडक स्पर्धेस  प्रतिसाद मिळाला. स्पर्धेची अंतिम लढत सिन्नर क्रिकेट क्लब व देवपूर क्रिकेट क्लब यांच्यात झाली. आठ षटकांच्या सामन्यात देवपूर क्रिकेट क्लबने ८४ धावा तर सिन्नर क्लबने ५९ धावा केल्या. बारा दिवस चाललेल्या स्पर्धेत ४५ संघांनी सहभाग नोंदविला. यात सिन्नर क्लब द्वितीय, तर शिवडे क्रिकेट क्लब तृतीय बक्षीसाचा मानकरी ठरला. देवपूर क्लबचा विजय सांगळे मॅन आॅफ द मॅच ठरला. पंकज भालेराव, सुरज पावसे, विकी वारूंगसे, अनिकेत हे उत्कृष्ट खेळाडू ठरले. सरपंच सविता वारूंगसे, अनिल वारूंगसे, मोहन ढोली, मनोज वाजे, जनार्दन पडवळ, दीपक वामने, दत्तू शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघाना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी संपत वारूंगसे, दत्तू वामने, सुनील मुजगुडे, रोहित ढोली, राहुल वाजे, रामदास वारूंगसे, रावसाहेब पवार, पंढरीनाथ वारूंगसे, अक्षय नन्नावरे आदी उपस्थित होते.

Web Title:  Devpur Cricket Association has won the MLA Cup

टॅग्स :localलोकल