शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

भक्तिसंगीताचा ‘स्वराभिषेक’

By admin | Updated: December 1, 2015 23:46 IST

स्वरसंगम : पं. शौनक अभिषेकी, पं. पणशीकर यांच्या मैफलीने गाठली उंची

नाशिक : ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’चा गजर झाला अन् यांच्या आलापाला दाद द्यावी की त्यांच्या तानेला, अशा सुखद खेळात रसिक रंगून गेले... पं. शौनक अभिषेकी आणि पं. रघुनंदन पणशीकर या दोघा दिग्गज गायकांच्या आगळी उंची गाठणाऱ्या मैफलीने रसिकांची अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी करून टाकली...के. के. वाघ कला अकादमीच्या वतीने आयोजित कर्मवीर कला महोत्सवाला आज ‘स्वरसंगम’ या भक्ती, नाट्य व भावसंगीताच्या मैफलीने प्रारंभ झाला. महाकवी कालिदास कलामंदिरात रंगलेल्या या मैफलीने रसिकांची जणू ब्रह्मानंदी टाळीच लागली. पं. शौनक अभिषेकी व पं. रघुनंदन पणशीकर यांनी वारकरी संप्रदायातील ‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजराने मैफलीला एकत्रित प्रारंभ केला. या दोघांतील स्वरांच्या जुगलबंदीने रसिकांना पुढच्या दोन-अडीच तासांत कोणत्या प्रतीचे गायन ऐकायला मिळणार, याची जणू चुणूकच दाखवली. त्यानंतर पं. अभिषेकी यांनी संत तुकारामांच्या ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म... भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा अभंग आपल्या खास शैलीत पेश केला. पं. पणशीकर यांनी सादर केलेल्या ‘अहो नारायणा सांभाळावे आम्हा दीना... आमुची राखावी ही लाज...’ या संत एकनाथांच्या अभंगाला रसिकांनी ‘वन्स मोअर’ दिले अन् टाळ्यांची साथ दिली. यानंतर संत सोहिरोबांचा ‘हरी भजनाविण काळ, घालवू नको रे’ हा अभंग पं. अभिषेकी यांनी सादर करीत मैफलीला उंचीवर नेऊन ठेवले. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या ‘देवाघरचे ज्ञान’सह ‘घेई छंद मकरंद’, ‘मुरलीधर श्याम’ ही नाट्यगीतेही सादर करण्यात आली. मध्यंतरानंतर ‘हे श्याम सुंदरा’, ‘रंध्रात पेरिली’ ही भावगीते, ‘बाजे रे मुरलिया’, ‘श्याम तोरी मूरत’ ही भक्तिगीते, ‘अबीर गुलाल उधळीत’ हा अभंग अशी एकाहून एक पर्वणीच कानसेनांना अनुभवायला मिळाली. पं. अभिषेकी व पं. पणशीकर यांनी एकत्रित गायलेल्या ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ या गीताने मैफलीचा समारोप झाला. प्रशांत पांडव (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), ज्ञानेश्वर दुधाणे (पखावज), रवींद्र पंडित (तालवाद्य) यांनी समर्थ संगीतसाथ केली. मिलिंद कुलकर्णी यांच्या रसाळ निरूपणाने मैफलीला रंगत आणली. के. के. वाघ संस्थेचे उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले, प्राचार्य केशव नांदूरकर, प्रा. विनायक सेउलीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)