भाविकांनी बाहेरून घेतले महादेवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST2021-08-17T04:21:18+5:302021-08-17T04:21:18+5:30

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून सुमारे दीड वर्षापासून मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी श्रावण सोमवारनिमित्त परिसरातील ...

Devotees took darshan of Mahadev from outside | भाविकांनी बाहेरून घेतले महादेवाचे दर्शन

भाविकांनी बाहेरून घेतले महादेवाचे दर्शन

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून सुमारे दीड वर्षापासून मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी श्रावण सोमवारनिमित्त परिसरातील महादेव मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते तसेच पूजा, अभिषेक, आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्यामुळे दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करतात. यंदाही कोरोना महामारीमुळे धार्मिकस्थळे बंद आहेत. त्यामुळे श्रावणी सोमवारी होणाऱ्या धार्मिक विधींना मर्यादा आहेत. दुसऱ्या श्रावणी सोमवारी अरुणोदय सोसायटीतील नागेश्वर महादेव मंदिरात सकाळी ७ वाजता सुनील ओतारी यांनी पूजा करून मंदिर बंद केले तसेच तसेच गीतांजली कॉलनीतील सर्वेश्वर महादेव मंदिर, विनयनगर साईनाथनगर, राजीवनगर, राणेनगरसह परिसरातील महादेवाचे भाविकांनी मंदिराबाहेरून दर्शन घेतले. मोकळ्या जागेत असलेल्या महादेवाच्या पिंडीला भाविकांनी अभिषेक केला.

Web Title: Devotees took darshan of Mahadev from outside