त्र्यंबकेश्वर : पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव येथील एका भाविकाचा अंजनेरी गडावरून खाली पडून मृत्यू झाला. सदर भाविकाचे नाव जालिंदर असू चासकर महाराज असे आहे. गडाच्या परिसरात वनविभागाचे वनरक्षक गस्त घालत असताना संजय बदादे यांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती मंडळ वन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे व त्र्यंबकेश्वर पोलिसांना दिली. तोपर्यंत पोलीस पाटील संजय चव्हाण घटनास्थळी दाखल झाले होते. सदर भाविकाचे नाव जालिंदर असू चासकर महाराज, रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे असे निष्पन्न झाले आहे. गडावर सध्या धुके असते. त्यात जबरदस्त थंडी असल्याने तो गडावर निवारा शोधण्याच्या प्रयत्नात खाली पडला असावा, अशी चर्चा आहे. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, पोलीन नाईक रूपेशकुमार मुळाणे, कॉन्स्टेबल सचिन गांगुर्डे, वनरक्षक डी.डी. शिंदे, ईश्वर गंगावणे, संतोष लांडे, मंगेश बदादे व हरिभाऊ निंबेकर आदींनी मृतदेह गडावरून आणण्यास सहकार्य केले. दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अंजनेरी गडावरून पडून पुण्याच्या भाविकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 01:44 IST