शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:53 IST

बागलाणचे आराध्यदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास रविवारपासून (दि.२२) सुरुवात झाली. याचबरोबर पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासही उत्साहात प्रारंभ झाला.

ठळक मुद्देदर्शनासाठी गर्दी : शहरातून ढोलताशाच्या गजरात रथ मिरवणूक

सटाणा : बागलाणचे आराध्यदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास रविवारपासून (दि.२२) सुरुवात झाली. याचबरोबर पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासही उत्साहात प्रारंभ झाला.पहाटे ४ वाजता बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ. सुप्रिया इंगळे-पाटील, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरु णा बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे, योगीता मोरे, विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे, कुसुमबाई सोनवणे यांच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. महापूजेचे पौरोहित्य राजेंद्र कुलकर्णी, शेखर मुळे, गजानन जोशी, मकरंद पाठक, पंकज इनामदार, संजय चंद्रात्रे, अमोल मुळे, अभय चंद्रात्रे,प्रवीण पाठक, गणेश मुळे, सुदर्शन मुळे, गौरांग जोशी,रोहित देशपांडे, पीयूष गोसावी, चेतन कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, विनय कुलकर्णी, प्रसाद चंद्रात्रे, धनंजय पंडित, ऋ षिकेश चंद्रात्रे आदींनी केले. पप्पू गुरव व शरद गुरव यांनी सनई चौघड्याचे वादन केले. महापूजेनंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.महापूजेप्रसंगी विश्वस्त रमेश देवरे, हेमंत सोनवणे, अ‍ॅड. विजय पाटील, राजेंद्र भांगडिया, प्रल्हाद पाटील,कौतिक सोनवणे, सुनील खैरनार, लालचंद सोनवणे, अभिजित बागड, अभिजित सोनवणे, स्वप्नील बागड, नगरसेवक डॉ. विद्या सोनवणे, महेश देवरे, वैभव गांगुर्डे, यशवंत सोनवणे, शिवा सैंदाणे, भगवान सैंदाणे, दत्तू बैताडे, रोशन सोनवणे, नीलेश अमृतकर, योगेश अमृतकर, मंडल अधिकारी जी.डी. कुलकर्णी, तलाठी जयप्रकाश सोनवणे, मनोज भामरे, समाधान पाटील, सेतु संचालक योगेश माळी, नाना देवरे, रमेश सोनवणे, ललित सोनवणे, देवीदास भावसार, शेखलाल मन्सुरी, बाबूलाल मोरे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, बागलाण तहसील कार्यालयात देवमामलेदारांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या खुर्चीची पूजा सकाळी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ. सुप्रिया इंगळे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या आवारात देवमामलेदारांच्या मंदिरात पहाटे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व अन्नपूर्णा गायकवाड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.सायंकाळी ४ वाजता आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, तहसीलदार इंगळे-पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते सपत्नीक महाराजांच्या रथाचे पूजन होऊन मंदिरापासून रथ मिरवणुकीचा प्रारंभ झाला. पोलीस दलाने रथ ओढण्याचा पहिला मान मिळवला. रथाच्या पुढे लोकनेते पं.ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूल, बेस्ट इंग्लिश मीडिअम स्कूल, व्हीपीएन विद्यालयांची लेजीम पथके होती.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम