सामाजिक संस्थांतर्फे देवळालीत कार्यक्रम

By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:32:16+5:302016-08-18T23:34:11+5:30

सामाजिक संस्थांतर्फे देवळालीत कार्यक्रम

Devlaliat Program by Social Institutions | सामाजिक संस्थांतर्फे देवळालीत कार्यक्रम

सामाजिक संस्थांतर्फे देवळालीत कार्यक्रम

 देवळाली कॅम्प : वंचितांना शिक्षण देत समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हाच खरा स्वातंत्र्य दिन असल्याचे प्रतिपादन प्रा. सुनीता आडके यांनी केले.
देवळाली आनंदरोड येथे इनरव्हील क्लब, छावणी परिषद व मधुर बिल्डर यांच्या संयुक्त विद्यमाने इमारत बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांच्या मुलांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्राथमिक शिक्षण देणारी दिशा हॅप्पी स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. आडके बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक गौरांग पटेल, प्रदीप पटेल, अरविंद पटेल, चेतन पटेल, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा दुर्गा माने, शशी मदान आदि उपस्थित होते.
या शाळेत शिकणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षणासोबत मोफत दुपारचे जेवण व वैद्यकीय सुविधा पुरवली जाणार आहे.
यावेळी अनिल कुमावत, प्रशांत वाघमारे मुन्नेश्वरी चिंधालोरे,
संतोष सातपुते आदि उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Devlaliat Program by Social Institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.