देवळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

By Admin | Updated: November 10, 2015 00:01 IST2015-11-09T23:59:44+5:302015-11-10T00:01:26+5:30

देवळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

Devla Nagar Panchayat employees' salary | देवळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

देवळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

देवळा : नगरपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर नवनिवार्चित नगरसेवक खुशीत दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत असताना येथील नगरपंचायत कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या घरी मात्र ऐन दिवाळीत अंधार असल्याची स्थिती निर्माण झाली असून, कर्मऱ्यांना दिवाळी आधी किमान दोन महिन्याचे तरी वेतन मिळावे यासाठी नगरपंचायतीचे प्रशासक शर्मिला भोसले यांनी प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मात्र असले तरी सोमवारही याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याने येथील ३० कर्मचाऱ्यांना दिवाळी सण साजरा कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे.
जिल्ह्यातील इतर नगरपंचायतींनी शासनाकडून येणाऱ्या नगरपंचायतींची शासनाची वाट न पाहता कर्मचाऱ्यांचे वेतन शिल्लक असलेल्या पैशातून केल्याने त्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार असल्याने देवळा नगरपंचायतील कर्मचारी मात्र अद्यापही वेतनापासून वंचित आहेत. या ३० कर्मचाऱ्यांमध्ये १४ सफाई कामगार असून, तीन रोजंदारीने काम करणारे कामगार आहेत. शहराच्या आरोग्याचा प्रश्न या सफाई कामगारांच्या हातात आहे.
वेतनापासून वंचित असतानाही या कामगारांनी कामावर जाऊन शहराचे आरोग्य बिघडू दिले नाही. मात्र वेतन न मिळाल्याने त्यांनी काम थांबवले तर ऐन दिवाळीत शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडून अरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे शासनस्तरावरून कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वेतन देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Devla Nagar Panchayat employees' salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.