माता जगदंबाच्या दर्शनासाठी देवगावला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:27 IST2018-10-12T16:26:56+5:302018-10-12T16:27:06+5:30

देवगाव : नवसाला पवणारी अशी महती असल्यामुळे देवगावच्या जगदंबा भवानीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नवसपूर्ती म्हणून होम हवन करतात. ही देवी अंबाबाई म्हणूनही प्रसिद्ध आहे.

 Devgava rush to see Mother Jagdamba | माता जगदंबाच्या दर्शनासाठी देवगावला गर्दी

माता जगदंबाच्या दर्शनासाठी देवगावला गर्दी

ठळक मुद्दे येवला तालुक्यातील मुखेड येथील शिवमंदिरात थांबून भोलेनाथची पूजा केली. तेथून विश्रांतीसाठी देवगाव येथील रमणीय स्थळी थांबली. येथून आकाशामार्गे देवीने लोणजाई डोंगराकडे प्रयाण केल्याचे देवी पुराणामध्ये नमूद आहे. येथे प्रत्येक नवरात्रोत्सवात घटी बसणाऱ्यांच्या

देवगाव : नवसाला पवणारी अशी महती असल्यामुळे देवगावच्या जगदंबा भवानीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नवसपूर्ती म्हणून होम हवन करतात. ही देवी अंबाबाई म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
देवगाव जेव्हा नावारूपाला येऊ लागले तेव्हा माहूर येथील कुशाबा बोचरे हे गृहस्थ येथे वास्तव्यास आले. येताना त्यांनी माहूरगडावरून तुळजाभवानी मातेचा तांदळासोबत आणला होता. तिची प्रतिष्ठापना करून येथे मंदिर उभारले. दैत्याचा वध करून देवी जात होती तेव्हा त्रिशुळाला लागलेल्या रक्ताचा थेंब ज्या जागेवर पडला त्या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले अशी आख्यायिका आहे. देवीपुराणामध्ये नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथे गोदावरी नदीतीरावर जगदंबेने आंघोळ केली.
मंदिराच्या सभोवती जनार्दन स्वामी मंदिर, भक्तनिवास, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, डी.आर. भोसले विद्यालय असल्याने परिसर दिवसभर गजबजलेला असतो. नवरात्रोत्साहात रात्रभर वाघे देवीची महती गात जागरण करतात. महिलावर्ग देवीची खणानारळाने ओटी भरून नवस फेडतात. उत्सवानिमित्त भवानीनगरातील युवकांनी मंदिर परिसरात साफसफाई करून विद्युत रोषणाईने सुशोभित केले आहे. तीस वर्षांपासून देवीभक्त बाळासाहेब गुरव हे देवी मंदिर व परिसराची देखभाल करतात. (12देवगाव माता)

Web Title:  Devgava rush to see Mother Jagdamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.