देवगावला आढळला कोरोनाबाधित रु ग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:50 IST2020-07-14T17:50:03+5:302020-07-14T17:50:43+5:30
देवगाव : येथे कोरोनाचा एक रु ग्ण बाधीत आढळल्याने आरोग्य विभाग खडबडुन जागा झाला आहे . भिवंडीत खासगी कंपनीत नोकरीला असणारा हा ३२ वर्षीय युवक पत्नीसह दोन दिवसांपुर्वी देवगावला आला होता.

देवगावला आढळला कोरोनाबाधित रु ग्ण
देवगाव : येथे कोरोनाचा एक रु ग्ण बाधीत आढळल्याने आरोग्य विभाग खडबडुन जागा झाला आहे . भिवंडीत खासगी कंपनीत नोकरीला असणारा हा ३२ वर्षीय युवक पत्नीसह दोन दिवसांपुर्वी देवगावला आला होता. देवगाव येथे आई- वडिलांना भेटण्यासाठी भिवंडीवरून आल्यानंतर तो एक दिवस थांबल्यावर त्याला तापाची सर्दी, तापाची लक्षण दिसू लागल्याने तो सोमवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी केली होती. तेथे कोरोनाचा संशय येणारी लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकिय अधिकारी डॉ. पुजा लहाने यांनी पिपळगाव बंसवत येथे जाण्याचा त्यांना सल्ला दिला होता. त्यानंतर लासलगाव येथे खाजगी लॅबमध्ये थुंकी तपासणीसाठी पाठविण्यात आली होती . त्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. सदर युवक राहत असलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सरपंच संजय निलख, उपसरपंच विनोद जोशी, पोलिस पाटील सूनील बोचरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुजा लहाने व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी रूग्णांच्या कुंटुबीयांची माहिती घेतली. गावात कोरोनाच्या झालेल्या शिरकावाने सात दिवस जनता कफर्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.