नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे जिल्ह्यांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:14+5:302021-06-01T04:12:14+5:30
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भूसंपादनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ बोलत होते. नाशिक- ...

नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे जिल्ह्यांचा विकास
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भूसंपादनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ बोलत होते. नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा देशातील पहिलाच मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी १ हजार ६३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, २३५ कि. मी. ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड डबललाइन रेल्वेमुळे अवघ्या पावणे दोन तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी रेल्वे लाइनची रचना करणारे महारेल हे पहिले महामंडळ असणार आहे. या तिन्ही जिल्ह्यांबरोबर इगतपुरी ते मनमाड सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
चौकट
तीन जिल्ह्यांतून जाणार मार्ग
भूसंपादनासह हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, प्रतितास २०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे. पार्सल व्हॅनची सुविधा असलेला हा रेल्वेमार्ग नाशिकला ओझर आणि पुणे विमानतळाशी जोडलेला असल्यामुळे कार्गो वाहतुकीशी जोडला जाणार आहे. नाशिक रोड, शिंदे, मोहदरी, सिन्नर, दोडी, पलसखेडे, सोनेवाडी, संगमनेर, अंभिरे, साकूर, जांबूत, बोटा, आळे फाटा, भोरवाडी, नारायणगाव, मंचर, राजगुरु नगर, चाकण, वाघोली, केलवडी, मांजरी, हडपसर, पुणे अशा चौदा स्थानकाचा समावेश असलेल्या या रेल्वे मर्गावर प्रवासी वाहतुकीला गती येणार आहे.