पंढरपूरच्या धर्तीवर जायखेड्याचा विकास करणार : दिलीप बोरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:33+5:302021-09-09T04:18:33+5:30

जायखेडा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी आमदार बोरसे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती ...

To develop Jaikheda on the lines of Pandharpur: Dilip Borse | पंढरपूरच्या धर्तीवर जायखेड्याचा विकास करणार : दिलीप बोरसे

पंढरपूरच्या धर्तीवर जायखेड्याचा विकास करणार : दिलीप बोरसे

जायखेडा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी आमदार बोरसे बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती ज्योती अहिरे, जायखेडा येथील सरपंच शांताराम अहिरे, पंचायत समिती सदस्य वसंत पवार, ब्राम्हणपाडेचे सरपंच अनिल बोरसे, आनंदपूरचे सरपंच प्रवीण भामरे, सोमपूरचे उपसरपंच समाधान मोरे, करंजाड येथील सरपंच अरुण देवरे, भडानेचे सरपंच अरुण भामरे, आखतवाडे सरपंच अशोक खैरनार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश देवरे, जिल्हा परिषदेचे उपअभियंता अशोक शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पाटकर, लघू पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अविनाश कापडणीस, विस्तार अधिकारी रघुनाथ सूर्यवंशी, नितीन देशमुख, दगडू बोरसे, पप्पू वाघ, कपिल देवरे, गोविंद देवरे, महेश देवरे, आदी उपस्थित होते.

आमदार बोरसे यांनी राजपूरपांडे, वाघळे, भडाने, सोमपूर, लाडूद येथे आमदार निधीमधून रस्ता काँक्रिटीकरण करणे, मोसम नदी पूल, भडाने -पिंपळकोठे रस्ता डांबरीकरण करणे, तांदुळवाडी येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना लोकार्पण, वाडीपिसोळ, वाघळे येथे सभामंडप बांधणे, भडाने येथे स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे, आखतवाडे, निताणे येथे पाणीपुरवठा योजना लोकार्पण, करंजाड -पारनेर रस्त्यावरील करंजाडी नदीवर पूल बांधणे, आदी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. (वा. प्र.)

----------------

करंजाड येथे पारनेर रस्त्यावरील करंजाडी नदीवर पुलाच्या कामाचा प्रारंभ करताना आमदार दिलीप बोरसे समवेत पंचायत समितीच्या सभापती ज्योती अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश देवरे, अशोक शिंदे, अरुण देवरे, आदी. (०९ सटाणा २)

080921\08nsk_28_08092021_13.jpg

०९ सटाणा २

Web Title: To develop Jaikheda on the lines of Pandharpur: Dilip Borse