शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरचे देवदर्शन आटोपून परतणाऱ्या भाविकांची कार उलटली; मध्य प्रदेशचे पाच भाविक जखमी

By अझहर शेख | Updated: August 26, 2023 19:04 IST

Nashik: त्र्यंबकेश्वर येथून देवदर्शन करून शहराकडे परतणारे मुळ मध्यप्रदेशमधील भाविकांच्या स्कॉर्पिओला गडकरी चौकातील सिग्नलवर शनिवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

- अझहर शेखनाशिक - त्र्यंबकेश्वर येथून देवदर्शन करून शहराकडे परतणारे मुळ मध्यप्रदेशमधील भाविकांच्या स्कॉर्पिओला गडकरी चौकातील सिग्नलवर शनिवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव स्कॉर्पिओची एका मिनी टेम्पोला धडक बसली आणि स्कॉर्पिओ कार चार ते पाच कोलांटउड्या घेत रस्त्यावर उलटली. सदैवाने या अपघातात जीवीतहानी टळली. एकाच कुटुंबातील पाच भाविक जबर जखमी झाले आहेत.

मध्यप्रदेश येथील रावत कुटुंबीय देवदर्शनासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे आले होते. देवदर्शन आटोपून त्यांनी परतीचा प्रवास रात्री स्कॉर्पिओ कारमधून (एम.पी ४२ बीसी ०५७७) सुरू केला. भरधाव कार नाशिक शहरातील गडकरी चौकातील सिग्नल ओलांडत असताना अचानकपणे मिनी टेम्पो (एम.एच१५ जीवी ०९६०) समोर आल्याने त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकून उलटली; मात्र कारचा वेग जास्त असल्याने कारने चार ते पाच कोलांटउड्या घेतल्या. यावेळी मोठा आवाज झाल्याने आजुबाजुचे काही लोक व रस्त्याने जाणारी वाहने थांबली. त्यांनी त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. जवळच विशेष पोलिस महानिरिक्षकांचे ‘दक्षता’ कार्यालय असल्यामुळे त्याठिकणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी नियंत्रण कक्षाला कळविले.

जखमींना त्वरित कारमधून बाहेर काढत रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चैत्राव चुननी रावत (७०,रा.शिवपुरी, मध्यप्रदेश), त्यांची पत्नी मिलाबाई चैत्राम रावत (६५) त्यांचा पुतण्या रामप्रसाद रूपलाल रावत (५०), त्यांची पत्नी सुशीला रामप्रसाद रावत (५०) यांच्यासह जगन्नाथ मौजी पुंडे (६५) असे जखमी झालेल्या भाविकांची नावे आहेत. या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम संध्याकाळी उशीरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक