देवनंदीजी महाराज यांचा चतुर्मास कलश स्थापन
By Admin | Updated: July 12, 2014 00:26 IST2014-07-11T22:41:46+5:302014-07-12T00:26:45+5:30
देवनंदीजी महाराज यांचा चतुर्मास कलश स्थापन

देवनंदीजी महाराज यांचा चतुर्मास कलश स्थापन
उमराणे : राष्ट्रसंत प्रज्ञाश्रमण आचार्यश्री देवनंदीजी महाराज यांचा चतुर्मास जैन नॉलेज सिटी, माळसाने, ता. चांदवड येथे होणार असून, रविवारी (दि. १३) दुपारी १ वाजता चतुर्मास कलश स्थापन कार्यक्रम होणार आहे.
मुंबई-महामार्गावरील माळसाने गावाजवळील उंच टेकडीवर भव्यदिव्य णमोकार तीर्थाची निर्मितीचे कार्य सुरू झाले असून, पाच एकर क्षेत्रात ६३ फूट उंच भव्यदिव्य पाच भगवानांच्या प्रतिमा स्थापन, नवग्रह जिनालय, गोशाळा व पशुसेवा केंद्र, आधुनिक शिक्षा मिळण्यासाठी जैन नॉलेज सिटी सर्वरोग निवारक नक्षत्र उपवन आदि विविध अद्वितीय योजना या ठिकाणी साकार होणार आहेत. श्री देवनंदीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली णमोकार तीर्थाचे निर्माण कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. विश्वशांती व पावसाचे आगमन व्हावे यासाठी सिद्धचक्र विधानाचे आयोजन केले होते. परमपूज्य यशकीर्तीजी, रतनकीर्तीजी, सिद्धकीर्तीजी, उत्कर्षकीर्तीजी महाराजांसह १५ संत व साध्वीजींचे सान्निध्याने विधानाचा कार्यक्रम व चतुर्मास संपन्न होणार आहे. उद्या, शनिवारी गुरुपौर्णिमा व सिद्धचक्र विधान समाप्ती कार्यक्रम संपन्न होणार आहे. सिद्धचक्र विधानासाठी बसणाऱ्या जैन बंधू-भगिनींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, मोठ्या संख्येने जैन बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रज्ञाश्रमण दिगंबर जैनाचार्य देवनंदी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)